शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केलं दिलेलं ‘चॅलेंज’ पूर्ण केलय, बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांना 5 फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सदर धमकी ही नारायण राणे समर्थकाने दिली असल्याचं आरोप देशमुखांनी केलं होतं…कुटुंबाविरोधात बोलल्यानेच ही धमकी आल्याचा देशमुखांचा आरोप आहे..
अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या या धमकीनंतर नितीन देशमुखांनी थेट राणेंना आव्हान देत मंगळवारी (७ फेब्रुवारी) म्हणजेच आज नरीमन पॉईंटला सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत धमकवणाऱ्या व्यक्तीची वाट पाहिली आणि याप्रकारे एक आव्हान नितीन देशमुख यांनी दिलं होत…
दिलेल्या आव्हानाप्रमाणे देशमुख आज सकाळी ८ वाजल्यापासूनच नरिमन पॉईंटला दाखल झाल आणि १० वाजेपर्यंत प्रतिक्षा केली..यादरम्यान त्यांनी नरिमन पोंइंट जवळ वॉक आणि योगाही केलं..मात्र कुणीही न आल्याने नितीन देशमुख तिथून निघाले.