सांगली – ज्योती मोरे
सालाबाद प्रमाणे मिरजेचे आराध्य दैवत हजरत खाजा शमना मिरासाहेब यांचा 16 फेब्रुवारी ला 648 वा उरूस आहे, या उरूसासाठी अनेक राज्यातून हजारोच्या संख्येने भक्तगणाची हजेरी असते. गोवा,कर्नाटक,तेलंगणा,मध्य प्रदेश,राजस्थान व आंध्र प्रदेशासह भारतातील विविध राज्यातून अनेक भाविक दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात.दर्गा परिसरात अतिरिक्त हॅलोजन बलचे व्यवस्था करण्यात यावी.तसेच उरसा निमित्त शास्त्रीय संगीताचा ही कार्यक्रम असतो,
या सर्व बाबींचा महापालिका प्रशासन व महसूल प्रशासनाने विचार करून सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. मिरज शहराला पिण्याकरिता 24 तास स्वच्छ मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच संपूर्ण उरूस काळात शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून एक पथक नेमून इतर भटकी जनावरासह कुत्र्यांचा बंदिस्त करावे,शहरांमध्ये व उरूस मार्गातील सर्व स्ट्रीट लाईट चालू स्थितीत ठेवणे व जे विद्युत ताराना अडथळा करणारे झाडाचे छाठण करावे.
तसेच जे विद्युत वाहिन्या खाली आहेत ते योग्य करण्याकरिता व विद्युत ट्रान्सफॉर्मर जे उघडे आहेत ते बंदिस्त करण्याकरिता संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करावे तसेच शहरांमध्ये रोजचा रोज कचरा उठाव डास प्रतिबंधक व रोग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी संपूर्ण शहरातील ड्रेनेजची साफसफाई व चोकप काढण्यात यावे जेणेकरून भाविकांना व स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही,
याची संपूर्ण दक्षता महापालिका प्रशासन व महसूल प्रशासनाने घ्यावी.यासह विविध मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरजेचे प्रांत समीर शिंगाटे साहेब तसेच मिरज महापालिकेचे उपायुक्त पाटील मॅडम व महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे, शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी, सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख,अजय बाबर,नासिर शेख, साद गवंडी व आफताब शेख आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते.