Friday, September 20, 2024
Homeराजकीयमिरज शहरात ६ कोटी ५५ लाखांच्या विकास कामांना सुरुवात-लवकरच ग्रामीण भागातील सात...

मिरज शहरात ६ कोटी ५५ लाखांच्या विकास कामांना सुरुवात-लवकरच ग्रामीण भागातील सात कोटी चाळीस लाखांच्या कामांना सुरुवात करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे…

सांगली – ज्योती मोरे

मिरज शहरात आमदार फंडासह नगर विकास विभागामार्फत एकूण सहा कोटी 55 लाख रुपयांच्या विकास कामांची सुरुवात झाली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या आमदार फंडासह नगर विकास विभागामार्फत ही कामे करण्यात येणार असून या सर्व कामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान मिरज शहरातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरोत्थान योजनेतून 26 कोटी 51 लाखांची कामे प्रस्तावित असून महानगरपालिका क्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून 33 कोटी 59 लाख 35 हजार रुपये इतका तर दलितेत्तरांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती आज पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शिवाय ग्रामीण भागासाठी राज्य शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेतून 5 कोटी रुपये तर आमदार फंडातून 2 कोटी 40 लाखांचा निधीही मंजूर असून ही कामेही लवकरात लवकर सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री खाडे यांनी पुढे बोलताना दिली.

दरम्यान सिविल हॉस्पिटल मधील एम आर आय मशीन साठीही 16 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या विशिष्ट रूमसाठी अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत.तर मिरज सिविल हॉस्पिटल साठी साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झाले असून तेही पैसे लवकरच उपलब्ध होतील असा विश्वास पालकमंत्री खाडे यांनी व्यक्त केला. या पाच महिन्यांमध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारने ही कामे केली असून, अर्थसंकल्पामध्ये सांगली जिल्ह्यासाठी पालकमंत्री या नात्याने जास्तीत जास्त पैसे उपलब्ध करून घेऊ विश्वासही

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: