Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन...दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास...

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन…दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास…

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. मुशर्रफ हे अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुशर्रफ अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीत झाला
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीतील दर्यागंज भागात झाला होता. 1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या काही दिवस आधी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते.

1998 मध्ये परवेज मुशर्रफ जनरल झाले

1998 मध्ये परवेझ मुशर्रफ जनरल बनले होते. त्यांनी भारताविरुद्ध कारगिलसारखे युद्ध करण्याचा कट रचला. पण भारताच्या शूर जवानांनी त्यांची प्रत्येक चाल हाणून पाडली. जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘इन द लाइन ऑफ फायर – अ मेमोयर’ या चरित्रात कारगिल काबीज करण्याची शपथ घेतल्याचे लिहिले आहे. मात्र नवाझ शरीफ ते तसे करू शकले नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: