नांदेड – महेंद्र गायकवाड
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प हा मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पात 781 दलघमी एवढी तूट निर्माण झाली आहे.परिणामी नांदेडसह मराठवाडा व विदर्भातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ होत नसल्याची बाब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतरही त्यांनी मंत्रालय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला यास यश मिळाले असून पैनगंगा नदीतील अतिरिक्त उपलब्ध असलेल्या पाणी वापरास शासनाने मंजुरी दिली आहे.
यात दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यातून 582 द.ल.घ.मी. तसेच गोजेगाव (संगम चिंचोली ) येथील 97 द.ल.घ.मी.पाण्याचा समावेश आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पा अंतर्गत प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात अतिरिक्त पाणी वापरामुळे सदर प्रकल्पात 781 दलघमी एवढी तूट निर्माण झाली असल्याचा शासनाचा अहवाल आहे. परिणामी नांदेडसह हिंगोली,यवतमाळ जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ होत नव्हता.
या तिन्ही जिल्ह्यातील केवळ 80 ते 85 हजार हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली येत होते. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली यानंतरही त्यांनी मंत्रालय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता तसेच या बाबतच्या अनेक मंत्रालय स्तरावरील बैठकांत मराठवाड्यातील सिंचन प्रश्नासह नांदेड जिल्ह्यातील जल व्यवस्थापन व सिंचन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांबाबत सादरीकरण केले होते.
याची दखल घेत तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते दरम्यान नाट्यमय रित्या सत्तातंर झाले यानंतरही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी संबंधित मंत्री तसेच विभागांकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता यास आता यश आले आहे. पाणी तूट भरुन काढण्यासाठी पैनगंगा नदीवर दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यातून 582 द.ल.घ.मी. तसेच गोजेगाव (संगम चिंचोळी) बंधारा येथील 97 द.ल.घ.मी.पाणी इसापूर धरणास वळविण्यास संबंधित विभागाने मंजुरी दिली आहे.
यामुळे आता 1 लाख 60 हजार 90 हेक्टर शेती सिंचनाखाली तसेच शेतीस नियमित पाणी उपलब्द होण्याची शक्यता आहे. पैनगंगा नदीतील अतिरिक्त उपलब्द असलेल्या पाणी वापरास शासनाची मंजुरी मिळाल्याच्या गुड न्यूजने लाभक्षेत्रात आनंदाची लहर पसरली असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण याचे आभार मानले आहे.