विधवा महिलांचा सन्मान…
उखाणे स्पर्धा व संगीतखुर्ची स्पर्धेची मेजवानी…
नरखेड – अतुल दंढारे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विचारमंच, काटोल तर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले सभागृह, काटोल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या संगिताताई सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले विचारमंच अध्यक्षा वैशाली डांगोरे, मंदाताई तिजारे, सरोजताई कुबडे, लताताई बोढाळे, कमलताई तरार, सुनंदाताई फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संगिताताई सूर्यवंशी यांनी सुगम संगीत कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद मिळविली.यावेळी विधवा महिलांचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सत्कार करण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक दिक्षा टेकाडे तर द्वितीय क्रमांक जयश्री पकडे आणि संगीतखुर्ची स्पर्धेत अनुक्रमे शितल चर्जन व अँड.भैरवी टेकाडे यांचा प्रथम-द्वितीय क्रमांक आला.विजेत्यांना ‘वृक्ष’ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड.भैरवीताई टेकाडे, संचालन विद्याताई कांबळे तर आभार प्रदर्शन रजनी नेरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोना खरबडे, मंगला श्रीखंडे, कल्पना गोमासे, प्रतिभा भेलकर, कांचन टेंभे, कविता कांडलकर, जयश्री वरोकर, वंदना डांगोरे, वैशाली श्रीखंडे, सोनाली तिजारे, अर्चना वरोकर, शिल्पा बोढाळे, सोनाली बोढाळे, रेखा वाघे,जया चोरकर आदींनी सहकार्य केले.
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याकरिता व व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करण्याकरिता हा कार्यक्रम घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.महिलांचा सन्मान करण्यात आला.
वैशाली संजय डांगोरे
अध्यक्षा, सावित्रीबाई फुले महिला विचारमंच, काटोल