सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाच्या जागेवर विमानतळच व्हावे यासाठी संबंधित विभागाला मेल पाठवला असून 13 तारखेनंतर होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे तसेच धावपट्टीसाठी आवश्यक असणारी आणखी वीस एकर जागा अधिग्रहण करून त्याच जागेवर विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ड्रायपोर्ट मागणी केली असली तरी त्यामुळे रांजणीत होणारा ड्रायपोर्ट कॅन्सल होणार नाही. यासाठी लागणारी जागा हस्तांतरित झाली नसल्याने थोडा वेळ होत असल्याचेही खासदार संजय पाटील यांनी म्हटले आहे.
शिवाय सांगलीला महामार्गावर आणण्यासाठी प्रयत्न असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याला यश आणल्याचं आणि रत्नागिरी नागपूर, ग्रीन हायवे, मुंबई- पुणे- बेंगलोर हायवेचेही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे.मनमाड वरून दिल्लीला जाणारा महामार्ग हा सांगली जिल्ह्यात चार पदरी करण्यात येणार असून त्याच्या कामास दोन ते तीन महिन्यात सुरुवात होणार असल्याचेही खासदार संजय पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.