अमरावती: अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीचे मतदान उद्या सोमवारी होणार आहे. आता फक्त मतदारांची थेट भेट यावर भर देण्यात येणार असून रविवारची रात्र ही महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या लढत होईल असे राजकीय जाणकारांचे मत असले तरी अरूण सरनाईक, शरद झांबरे, वंचित बहुजन आघाडी प्रा. अनिल अंमलकार हेही उमेदवार काही कमी नाहीत. त्यामुळे रविवारची रात्र वैऱ्याची ठरणार असून एक-एका मतदाराची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मतपत्रिका आणि पेट्या मतदान केंद्रांवर पाठविण्यात आल्यायेत. उद्या सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत हे मतदान होणार आहेय..या मतदारसंघातून उपमुख्यमंत्र्यांचे अतिशय ‘खास’, दोन वेळा आमदार असलेले आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेय. यावेळी डॉ. रणजीत पाटलांसमोर धीरज लिंगाडेंसह प्रमुख आव्हान असलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईकांचे बंधू अरूण सरनाईक रिंगणात आहे. यासोबतच डॉ. पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले शरद झांबरे हेही उभे आहेत. सोबतच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.अनिल अमलकार असे एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेय..
अमरावती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राज्यातील शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारची प्रतिष्ठाच पणाला लागलीय.. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात उपमुख्यमंत्री यांचे कट्टर समर्थक, अतिशय ‘खास’ असे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे येथे भाजपाचे उमेदवार आहेय.. डॉ. रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्रीच अमरावतीत आले होतेय, यावरून त्यांनी ही निवडणूक किती गांभिर्यानं घेतलीय हे लक्षात येतेय..या निवडणुकीत विभागातील 30 विधानसभा मतदार संघाचा समावेश असून 56 तालुके आहेत…
अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ अशा पाच जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील एकूण 2,06,175 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बाजवणार आहेय.. तर अकोल्यात एकूण 50606 मतदार मतदानाचा हक्क बाजवणार असून यासाठी 61 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आले आहेय..2017 च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 2,10,491 होती जी या निवडणुकीत 2,06,175 झाली आहेय यामुळे सुमारे 4 हजार मतदार कमी झाले आहेय…