Independence Day – देशात आजचा दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याचा हा सण सर्वजण साजरा करत असून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांचे स्मरणही लोक करत आहेत. आपण देशातील अशाच एका अनोख्या मंदिराविषयी जाणून घेऊया जिथे क्रांतिकारकांची पूजा केली जाते. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन या मंदिरात दररोज पूजा करण्यासाठी येतात.
हरियाणाच्या यमुनानगरमध्ये असलेले हे मंदिर गुमथला नावाच्या गावात आहे. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, येथे सुमारे 22 वर्षांपूर्वी एक इंकलाब मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिराचा प्रत्येक दिवस हा उत्सव असतो. येथे मदर इंडिया डे साजरा केला जातो. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ येथे ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात.
शहीदांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या भारतातील एकमेव इंकलाब मंदिरात शहीदांच्या पुतळ्यासमोर लोक नतमस्तक होतात, तर शहीदांचे कुटुंबीयही येथे येतात. शहीद मंगल पांडे यांचे वंशज देवीदयाल पांडे आणि शीतल पांडे यांनीही येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. राज्याचे क्रीडा मंत्री संदीप सिंह, आरएसएसचे इंद्रेश कुमार, माजी राज्यमंत्री करण देव कंबोज, बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे सदस्य आर मोहम्मद देखील येथे आले होते.
या मंदिरात राजगुरू, शहीद सुखदेव, शहीद आझम भगतसिंग, लाला लजपत राय, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ.बाबसाहेब आंबेडकर, अशफाक उल्ला खान यांच्या जयंती आणि पुण्यतिथींना साजरे केले जातात. रिपोर्टनुसार, इन्कलाब मंदिराचे संस्थापक अधिवक्ता वरयम सिंह म्हणतात की, संपूर्ण देशात असे मंदिर नाही.