Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमोटरसायकल गॅस सिलेंडर तसेच घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून अटक...

मोटरसायकल गॅस सिलेंडर तसेच घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून अटक…

सांगली – ज्योती मोरे

घरपोडी मोटरसायकल चोरीसह गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांचा तपास करत असताना खास बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हर्नमेंट कॉलनी छापा टाकून अमोल मदन पवार वय वर्षे 30 राहणार स्वामी समर्थ मंदिराशेजारी निकुंज अपार्टमेंट विश्रामबाग सांगली मूळ राहणार सांडगेवाडी हनुमान मंदिरा शेजारी तालुका पलूस याला अटक करण्यात आली आहे.

तर चंद्रकांत जालिंदर वाघमारे वय वर्षे 52 राहणार एसटी कॉलनी दत्तनगर विश्रामबाग सांगली या इसमाने यापैकी काही साहित्यांची खरेदी केल्याने त्यालाही पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपीकडून 45 हजार रुपयांचे पंधरा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर टाक्या वीस हजार रुपये किमतीचा एल.जी कंपनीचा एक एलसीडी टीव्ही,दहा हजारांचा एक सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही, पंधरा हजारांचा एक डेल कंपनीचा लॅपटॉप, दोनशे रुपये किमतीची लॅपटॉप बॅग आणि पंधरा हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल असा एकूण एक लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्यांचे ज्यांचे गॅस सिलेंडर चोरीस गेले आहेत,अशा लोकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील,सहायक पोलीस फौजदार अनिल

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: