Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू...कान्हेरी ते एरंडा रोडवरील...

अकोला | तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू…कान्हेरी ते एरंडा रोडवरील शेतशिवारातील घटना…

अकोला जिल्हातील कान्हेरी ते एरंडा रोडवरील शेतशिवारातील तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली असून मृत्यू झालेल्या दोघांनाही पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बाहेर काढले आहे. तर दोघेहे मध्य प्रदेशातील मजूर असून ते कुटुंबासह कान्हेरी येथे वास्तव्यास होते. अनिल शन्नीलाल उईके वय (28) वर्ष रा.ब्रजपुरा ता.जुन्नारदेव जि.छिंदवाडा म.प्र.व पुष्पेंद्र कनस कुमरे वय (25) वर्ष रा.पसलाई ता.जी.बैतुल म.प्र. असे मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास चौघे मित्र शेतशिवारातील एका तलावात पोहण्यासाठी गेले, तलावात दूरपर्यंत पोहोचताना अचानक दोघे जण बेपत्ता झाले, त्यांच्या दोन्ही मित्रांनी दोघा तरुणांचा शोध घेतला, पण त्यांचा थांग पत्ता लागला नाही. या वेळी सोबतचे दोन्ही मित्र घाबरत बाहेर आले आणी परीवाराला माहीती दिली. मरण पावलेल्या दोघांनाही पाण्यात चांगल्याप्रकारे पोहता येत होतं, मात्र तलावाच्या मधोमध पंधरा ते वीस फूट खोल विहीर असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज घेता आला नाही, आणि दोघेही एकमेकांना पकडून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज घटनास्थळीवर वर्तवला जात होता.

रेस्क्यु बोट व शोध बचाव साहीत्यासह घटनास्थळी पोहचले यावेळी तलावात सर्च ऑपरेशन चालु केले असता सोबत असलेल्या मित्रांनी बुडालेली जागा दाखवली असता तेथे काही दिसुन येत नव्हते पुन्हा दिपक सदाफळे यांनी सोबतच्यांना बारकाईने विचारपुस केली असता त्या ठिकाणी अंडर वाॅटर सर्च केले असता तलावात तळाशी एक मोठी विहीर आणी त्या मध्ये 15-20 फुट खोल पाणी असल्याचा अंदाज आला तेव्हा जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी क्वीक प्लॅनींग केली आणी विहीरीत सर्च ऑपरेशन चालु केले तेव्हा लगेच एक तळाशी मृतदेह हाती लागला त्याला वर आणले परत दुसरा शोधण्यासाठी तळाशी गेले असता तीस-या टप्प्यात दुसरा मृतदेह पण हाती लागला दोन्ही मृतदेह पोलीस आणी नातेवाईकांच्या ताब्यात दीले यावेळी बार्शिटाकळी पोस्ट.स्टे चे ठाणेदार सोळंके सर आणी पोलीस कर्म चारी हजर होते अशी माहीती दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: