Sunday, December 22, 2024
Homeराज्यहडियामाल शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उपोषणाला प्रशांत डिक्कर यांची भेट...

हडियामाल शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उपोषणाला प्रशांत डिक्कर यांची भेट…

सातपुड्याच्या पायथ्याशी तालुक्यातील हडियामाल शिवारातील कृषी पंपाला करमोडा सबस्टेशन वरुण विज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मा.जि.प.सदस्य डॉ वासुदेव गांवडे यांच्या नेतृत्वात आदिवासी शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या कृषी धारक आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्याची पुर्तता न करता या आंदोलनाला महावितरणने बेदखल केले असल्याने सर्व शेतकरी वर्गाकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या आंदोलनाला प्रशांत डिक्कर यांनी आदीवासी शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी टाठरतेची भुमिका न ठेवता तत्काळ आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात तोडगा काढावा अन्यथा स्वाभिमानी नेहमीप्रमाणे परिणामाची चिंता न करता आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी यावेळी महावितरणला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: