Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनशाहरूख खानच्या पठाण चित्रपटावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बजरंग दलाने चित्रपटाचे पोस्टर्स हटवले...

शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बजरंग दलाने चित्रपटाचे पोस्टर्स हटवले…

खामगाव : पठाण चित्रपट प्रदर्शन न करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आज खामगाव शहरातील सर्व चित्रपटगृहाच्या मालकांना निवेदन दिले. तरीही आज चित्रपटगृहाने पठाण चित्रपटाचे होर्डिंग लावले. बजरंग दलाने ताबडतोब तीव्र निदर्शने करून सदर काही होर्डिंग हटवले व विरोध प्रदर्शन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत ह्या चित्रपटतिल भावना दुखवनारे चित्र प्रदर्शित करू नये तसेच भारतीय नागरिकांनी हा चित्रपट बायकॉट करावा असे आवाहन केले

विरोधादरम्यान खालील मुद्देही कळविण्यात आले – शाहरुख खान वारंवार आपल्या वक्तव्यातून भारताबद्दल नापसंती आणि पाकिस्तान बद्दल प्रेम दाखवत आला आहे. वास्तविक पहाता इथल्या चित्रपटप्रेमींच्या जीवावर प्रचंड माया, संपत्ती जमवायची आणि पाकिस्तानस्थित दाऊदच्या इशा-यावर सातत्याने देशविरोधी वागणूक आणि वक्तव्ये करायची अशी यांची दुटप्पी भूमिका असते. तो मुस्लिम असल्याने त्याला विरोध होतोय का? तर नाही.

१) त्याने वारंवार पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल ३ मध्ये खेळवा अशी मागणी केली
२) भारताने क्रिकेट मध्ये वर्ल्डकप जिंकला तेव्हा आपला राष्ट्रध्वज उलटा फडकाविला
३) भारतामध्ये असहिष्णुता वाढीस लागली आहे असे वक्तव्य केले
४) आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला
५) “पाकिस्तान जिंकल्यावर मला माझे वडील जिंकल्याचा आनंद होतो” असे वक्तव्य केले
६) आतंकवादी हाफीज सईदने पाकिस्तानात येऊन रहाण्याचे सुचविल्यावर त्याला एका शब्दानेही विरोध केला नाही.

त्याचप्रमाणे दिपिका पादुकोण CAA विरोधातील आंदोलनात JNU मध्ये पाठींबा दयायला गेली होती. या आंदोलनात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. म्हणजेच हे फक्त पडद्यावर देशप्रेमाची भूमिका निभावतात आणि प्रत्यक्षात यांची भूमिका देशद्रोही आहे असे निदर्शनास येते.

सर्व रूपातील आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी बजरंग दल कटिबद्ध आहे. पोलीस प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन असे वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करणे बाबत समज द्यावी असे आवाहन बजरंग दल प्रांत संयोजक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: