हेमंत जाधव
विश्व हिंदू परीषदेच्या सामाजीक समरसता अभियानाअंतर्गत आज खामगाव येथे श्री छ.शिवाजी महाराज नगर येथील श्री ओंकारेश्वर मंदिर येथे विविध हिंदू समाजातील 51 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
महाआरतीनंतर झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बंजरंग दल प्रांत संयोजक मा. श्री अमोलजी अंधारे यांनी आपले विचार मांडतांना सर्व संत मंडळी व थोर पुरुषांनी जाती पलीकडे जावुन देव, देश धर्मासाठी अतुलनीय कार्य केले असल्याचे सांगून विश्व हिंदू परीषद जात, पात पक्ष, पंथ, प्रांत भेद विसरून सर्व हिंदुना एकत्रित आणन्याचे कार्य करते असे सांगितले.
समारोपीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्री रामदादा मोहिते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय धर्म टिकवण्याचे अनमोल कार्य केल्याचे सांगून त्यांच्यासोबत च संत श्री गाडगेबाबा यांनी सर्व समाजात समरसतेचा भाव निर्माण होण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी विहिंप जिल्हा पालक श्री बापुसाहेब करंदीकर यांनी विहिंप च्या नगरात सुरु होणार्या विविध उपक्रमाविषयी माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहिंप नगर अध्यक्ष श्री राजेश जी मुळिक यांनी केले. संचलन नगर मंत्री सचिन चांदूरकर व आभार प्रदर्शन नगर समरसता प्रमुख भिकाजी रेठेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री विजय राखोंडे,विकास आंबेकर, श्याम आंबेकर, सचिन केवारे, लक्ष्मण गाडे, अशोक मोरे, सागर चुंबळकर, अमोल जोशी, सागर खिरडकर यांनी प्रयत्न केले.
महाआरती तसेच कार्यक्रमाला विहिंप बजरंग दल मातृशक्ती व दुर्गावाहिनी चे पदाधिकारी व कार्यकर्ते, श्री ओंकारेश्वर संस्थान समिती सदस्य तसेच विविध हिंदु समाजाचे बंधु भगिनी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.