पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील शेख लुकमान शेख दिलावर वय ४५ यांच्या कांदा या पिकाला पाणी देत असतांना अचानक शॉक लागल्याने शेतकऱ्याच्या विहरित पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे.
सस्ती भाग २ मधील गट क्रमांक २१६ मध्ये शेतकरी शेख लुकमान शेख दिलावर यांच्या शेता मध्ये कांदा लागवड सुरू होती त्या पिकाला पाणी देत असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला होता.यामुळें शेतकरी मोटर पंप जवळ बघण्यासाठी गेला असता अचानक शॉक लागला व जवळच असलेल्या ४५ फूट विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.याबाबत घटनेची माहिती चान्नी पोलीस यांना दिल्यानंतर घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला.
यावेळी चान्नीचे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संजय वाडेकर यांनी विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला यावेळी उपनिरीक्षक गणेश महाजन सस्ती बीड जमादार प्रवीण सोनोने,पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर करवते, महादेव देशमुख ,हर्षल श्रीवास, प्रभारी पोलीस पाटील विजय सरदार आदी कर्मचारी उपस्थित होते प्रशासन कर्मचारी पोहचले नव्हते.या घटनेने गावतील ग्रामस्थांच्या एकच गर्दी झाली होती.