नांदेड – महेंद्र गायकवाड
मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीने रस्त्यावर जाता-येतांना अश्लिल चाळ्यांना व अश्लिल शिवीगाळीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर 23 वर्षीय तरुणावर मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एका 20 वर्षीय युवतीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या 20 वर्षीय मुलीने आपल्याच घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याचे कारण नमुद करतांना तक्रारीत असले लिहिली आहे की, उध्दव भाऊराव शिंदे (23) हा युवक त्यांच्या मुलीला रस्त्यावरून जाता-येतांना अश्लिल चाळे करत असे, अश्लिल भाषेत शिवीगाळपण करत असे घडलेला प्रकार युवतीने आपल्या वडीलांना सांगितला.
याबाबत युवतीच्या वडीलांनी त्या युवकाला विचारणा केली तेंव्हा त्या उध्दव भाऊराव शिंदेने तिच्या वडीलांचा सुध्दा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. हा अपमान सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली आहे. मुदखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 294 त्या युवकावर् गुन्हा क्रमांक 21/2023 दाखल केला आहे. मुदखेडचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक माधुरी यावलीकर हे करित आहेत. या युवकास तात्काळ अटक जरून कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे.