Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमद्दीगुडम जवळ अवजड ट्रकच्या धडकेत युवक ठार...

मद्दीगुडम जवळ अवजड ट्रकच्या धडकेत युवक ठार…

अहेरी, सुरजागड येथील पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल (दि. 16) रात्री 7 वाजताच्या
सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली. निकेश चोखारे (30) रा. लक्ष्मणपूर, ता. चामोर्शी असे मृताचे नाव आहे. एटापल्ली दररोज पहाडावरून लोहखनिज नेणारे शेकडो ट्रक सुरजागड – एटापल्ली – अहेरी – आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने धावत असतात. यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

तीन महिन्यांपूर्वी सुरजागड ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. त्यावेळी नागरिकांनी 10 ट्रक पेटवून दिले होते. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच काल एका ट्रकने निकेश चोखारेचा बळी घेतला. निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच चालक म्हणून कार्यरत होता. पत्नी गरोदर असल्याने तो रजा घेऊन गावी गेला होता. रजा संपल्याने तो काल कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयात गेला.

तेथे हजेरी लावून परताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी (मंगळवारी)निकेशच्या पार्थिवावर लक्ष्मणपूर या त्याच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: