कोल्हापूर – राजेंद्र ढाले
प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री.श्री . रविशंकरजी तब्बल अकरा वर्षानंतर ३१ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे भक्ती-उत्सव महासत्संग कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. त्याच्या आगमनाच्या निमित्याने आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर मार्फत कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात उपेक्षित कुटुंबासाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. उचगाव तावडे हॉटेल परिसरातील गोपाळ समाजातील लहान मुले, व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, स्थलातरीत कामगार रस्त्यावरील बेघर यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. यावेळी सर्वांना मोफत ओषधे वाटप करण्यात आली.
युवा ग्रामीण विकास संस्था व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने येथे मोफत आरोग्य शिबीर पार पडले.शिबिरासाठी डॉ. कमलेश वाधवानी, डॉ. शीतल अनांदे, डॉ. सुरेखा पाटील, डॉ. संयोगिता पाटील, डॉ. राधिका कोरगावकर, स्वयंसेवक गायत्री काळे, रब्बिया अत्तार, सचिन लाड, प्रल्हाद कांबळे, दिपाली सातपुते, विजय राजपाल, शारदा गुरव, सुजाता राजपाल, आनंद सज्जन, यांच्या सह युवा ग्रामीण विकास संस्थेचे पिअर लीडर, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी मानले.