Thursday, November 14, 2024
Homeराज्यअखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ खामगाव द्वारा आयोजित...

अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ खामगाव द्वारा आयोजित सकल मराठा समाज व शिवभक्तांची भव्य मोटर सायकल रॅली नियोजन बैठक उत्साहात संपन्न

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ खामगाव च्या वतीने सकल मराठा समाज बांधव,समस्त शिवभक्त यांच्या भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्म सोहळ्या नंतर सकाळी 9 वाजता निघणाऱ्या या भव्य रॅलीचे यशस्वीतेसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर येथील मराठा समाज सभागृहात मराठा समाज बांधवांची व समस्त शिवभक्तांची मोठी नियोजन बैठक रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी मोठया उत्साहात संपन्न झाली. यावेळी मोठया संख्येने खामगाव शहरातील मराठा समाज बांधव व शिवभक्त उपस्थित होते.यावेळी खामगाव शहरातील युवावर्गाची उपस्थिती लक्षणीय व उत्स्फूर्तपणे होती.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक श्री रामदादा मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँ साहेब, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व.श्री अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. याप्रसंगी श्री रामदादा मोहिते,अखिल भारतीय मराठा महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री संजय शिनगारे,जिल्हा संपर्क प्रमुख श्री रमाकांत गलांडे,मराठा समाज सेवा मंडळ अध्यक्ष श्री सुरेश घाडगे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी शहराध्यक्ष श्री प्रवीण कदम यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर मराठा समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष श्री रामभाऊ बोंद्रे, श्री चंद्रकांत रेठेकर,श्री तानाजीराव घोगरे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री किशोर गरड,मराठा पाटील सेवा मंडळ उपाध्यक्ष श्री नरेंद्र शिंगोटे,युवक आघाडी चे श्री अनिल मेतकर,महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती अनिताताई तनपुरे, शहर अध्यक्षा सौ.मिनलताई कदम यांची उपस्थिती होती.यावेळी सदर रॅली भव्य दिव्य स्वरूपात काढण्याचा निर्धार उपस्थित मराठा समाज बांधवांच्या व समस्त शिवभक्तांच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मराठा समाज सेवा मंडळाचे माजी सचिव श्री राजेश काळे व आभार प्रदर्शन श्री प्रवीण कदम यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: