Saturday, September 21, 2024
HomeविविधNepal Aircraft Crash | नेपाळमध्ये विमान कोसळले…३० प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती…बचाव कार्य...

Nepal Aircraft Crash | नेपाळमध्ये विमान कोसळले…३० प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती…बचाव कार्य सुरु…

Nepal Aircraft Crash : नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. तपशीलांची प्रतीक्षा आहे. नेपाळच्या स्थानिक मीडियानुसार, या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. काही अहवालांमध्ये 30 जणांचे मृतदेह बाहेर काढल्याचा दावा केला जात आहे. सुमारे 15 मृत्यूची अधिकृत नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, विमान कंपन्या आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ क्रॅश झालेले प्रवासी विमान ATR-72 हे यति एअरलाइन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली
पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पंतप्रधान पुष्प कल दहल ‘प्रचंड’ यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करानेही घटनास्थळी पोहोचून जबाबदारी स्वीकारली आहे.

लँडिंग करण्यापूर्वी क्रॅश
मिळालेल्या माहितीनुसार, विमान टेकडीवर आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ क्रॅश झालेले प्रवासी विमान ATR-72 हे यति एअरलाइन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

मागील वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खराब हवामानामुळे विमान डावीकडे न जाता उजवीकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे विमान डोंगरावर जाऊन कोसळले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: