Friday, September 20, 2024
HomeMarathi News Todayभारत जोडो यात्रेत खासदार संतोख चौधरी यांचे निधन…

भारत जोडो यात्रेत खासदार संतोख चौधरी यांचे निधन…

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेण्यासाठी आलेले जालंधरचे खासदार संतोख चौधरी यांचे शनिवारी निधन झाले आहे. दरम्यान, फगवाडाजवळील भाटिया गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चौधरी यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा थांबविण्यात आली. चौधरी हे ७६ वर्षांचे होते.

संतोख चौधरी हे दोआबातील प्रमुख दलित नेते होते. ते दुसऱ्यांदा खासदार झाले. संतोख चौधरी हे पंजाबमध्ये मंत्री होते. पंजाबचे पहिले शिक्षणमंत्री मास्टर गुरबंता सिंग यांचे ते पुत्र होते. त्यांचे पुत्र विक्रमजीत सिंह चौधरी हे फिल्लौरचे आमदार आहेत.

चौधरी 2014 मध्ये अकाली दलाच्या पवनकुमार टिनू यांचा पराभव करून 16 व्या लोकसभेवर निवडून आले होते. 2004 ते 2010 पर्यंत ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. 2002 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात ते सामाजिक सुरक्षा, महिला व बालविकास, समाजकल्याण, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन खात्याचे मंत्री होते. 2002 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर फिल्लौर विधानसभेची जागा जिंकली. त्यांनी अकाली दलाच्या सर्वन सिंग यांचा पराभव केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: