सांगली – ज्योती मोरे.
समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचे कीर्तनाने आणि भव्य वारकरी दिंडीने सोहळ्याची होणार सांगता..वारकऱ्यांनी टाळ, मृदुगासह सहभागी होण्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांचे आवाहन.
मागील 10 दिवसापासून सांगलीमधील नेमिनाथनगर मध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा अयोध्यानगरी मधील रामकथाकार समाधान महाराज शर्मा यांच्या रामकथा सोहळ्याची अतिशय रम्य सोहळ्याने सांगता झाली.
सध्याच्या युगात रामराज्य येण्याकरिता आणि आपल्यातला राम प्रकट होण्यासाठी स्वतः मधल्या विकृत रुपी रावणाचा नायनाट करावा आणि धर्म समनव्याची भूमिका मांडणारा चारित्र्य संपन्न समाज तयार होणे आवश्यक आहे असे आवाहन समाधान महाराज यांनी केले. या सांगता सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित समाधान महाराज शर्मा यांना महिलांनी ओवाळत रामायण ग्रंथाची पूजा केली आणि याने रामकथेची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भक्तांनी रामकथेचा जप केला.
आरती प्रसंगी अयोध्या नगरी मध्ये उपस्थित हजारो महिला, पुरुष , बालकांनी हातात मेणबत्ती घेत आणि अयोध्या नगरी मधील लाईट घालवत संपूर्ण मांडव या मेणबत्तीच्या प्रकाशात उजळून निघाला. उद्या 9.30 ते 11 या वेळेत समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचे कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
रघुनंदन महाराज पुजारी, तेर यांच्या दोनशे मुलांच्या लेझीम पथकाचे यावेळी खास आकर्षण असणार आहे. यावेळी भव्य मिरवणूक , भव्य वारकरी दिंडी निघणार असून या सोहळ्यात सर्व वारकऱ्यांनी टाळ, मृदुगासह सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेय. सोहळ्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या निघणाऱ्या या भव्य अशा वारकरी दिंडी मध्ये तमाम वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी केलं आहे.