पातुर – निशांत गवई
पातुर येथील रामनगर मधील सेवानिवृत्त शिक्षक के डी चव्हाण यांना एक लाख रुपये लुटून नेल्याची घटना दिनांक 29 9 2022 ला भरदिवसा घडली होती या प्रकरणी पातुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 3 12 /22 कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला होता यामधील दोन आरोपींना पातुर पोलिसांनी जेरबंद केले आहे सविस्तर वृत्त असे आहे की सेवानिवृत्त शिक्षक के डी चव्हाण हे दिनांक 29 12 2022 ला पातुर अकोला रोडवरील को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
त्यांनी तीन लाख रुपये बँकेतून काढले होते त्यापैकी दोन लाख रुपये हातातील पर्स मध्ये ठेवले तर एक लाख रुपये दुचाकीच्या डिक्की मध्ये दस्तीमध्ये बांधून ठेवले होते तर आरोपी राजेश पवलू गोटेटी व 36 अनिल बद्री पेटला वय 22 राहणार टीपटा मंडळ बोगोल तालुका कावसा जिल्हा नेलोर आंध्र प्रदेश यांनी पातुर अकोला रोडवर सेवानिवृत्त शिक्षक के डी चव्हाण यांना दहा रुपयाच्या 7 ते 8 नोटा रोडवर फेकून पैसे पडल्याचे सांगितले फिर्यादी चव्हाण हे नोटा घेण्यासाठी गेले.
असता आरोपी त्यांनी मोटरसायकलच्या डिक्की मधील एक लाख रुपयांची रक्कम नेली होती सदर प्रकार भर दिवसा घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते मात्र या प्रकरणाचा पातुर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी त्यांना 12 जानेवारी 2023 ला अटक केली आहे सदर आरोपींनी रामटेक येथे सुद्धा असाच प्रकार करून पैसे लुटल्याची घटना केली होती रामटेक पोलिसांनी कसून चौकशी केली असता पातुर मध्येही चोरी केली असती कबुली दिल्यामुळे पातुर पोलिस यांना याबाबत माहिती दिली.
पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिलीप इंगळे एनपीसी पंजाबराव चराटे पीसी अजय ठाकूर यांनी रामटेक येथून आरोपींना अटक करून पातुर पोलीस स्टेशन आणले