Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीखामगाव येथील विदर्भ कृषी दुकानाचे कुलूप तोडुन केली लॅपटॉपची चोरी...

खामगाव येथील विदर्भ कृषी दुकानाचे कुलूप तोडुन केली लॅपटॉपची चोरी…

खामगाव – दिनांक 11/01/2023 रोजी फिर्यादी सचीन अजय पुरवार वय 38 वर्ष व्यवसाय कृषी केंन्द्ररा.ङिपी रोड रायगड कॉलनी खामगाव यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, त्यांचे सरकी लाईन खामगाव येथील विदर्भ कृषी दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानातील Lenevo कंपणीचे लॅपटॉप कि.35000/- रु व चिल्लर नगदी 1000/- रु असा एकुण 36000/-रु मुद्देमाल चोरुन नेला आहे.

अशा रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुध्द कलम 461,380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर गुन्हयाचा तपास सफौ मोहन करुटले बनं 1452 यांचे कडे देण्यात आला.पो.नि सा प्रदिप त्रिभुवन पोस्टे खामगाव शहर व डिबी पथक सफौ मोहन करुटले,नापोकॉदिनेशसिंग इंगळे,पोकॉ गणेश कोल्हे, राम धामोडे, अरविंद कोकाटे, अमरदिपसिंह ठाकुर, प्रफुल टेकाळे यांनी काही तासातच गुन्हयाचा छळा लावुन गुन्हयातील अज्ञात आरोपी अतिष उर्फ बाला शिवलाल जोयरे वय 22 वर्ष रा. सतीफैल खामगाव यास निष्पन्न करुन आरोपीने चोरी केलेला Lenevo कंपणीचे लॅपटॉप कि.35000/- रु व चिल्लर नगदी 1000/- रु असा एकुण 36000/-रु मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक सा, बुलडाणा, मा. अपर पोलीस अधीक्षक सा, खामगाव, मा. उपविपोअसा,खामगाव यांचे मार्गदर्शनात पो.नि प्रदिप त्रिभुवन पोस्टे खामगाव शहर व गुन्हे शोध पथकातील वरील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: