सांगली – ज्योती मोरे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज यांची आज पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत खजिनदार पदी बिनविरोध निवड करण्यात आली . तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी आमदार मा. रोहित पवार यांची निवड करण्यात आली.
संजय बजाज यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील क्रिकेट खेळाच्या व खेळाडूंच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याचीच दखल घेत आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड करत मोठी जबाबदारी दिली आहे.
या निवडी नंतर संजयजी बजाज म्हणाले की , आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रामाणिक पणे व सर्व सामान्य खेळाडूंना न्याय मिळावा या साठी जी भूमिका घेत काम केले त्याच पद्धतीने यापुढे ही काम करत राहू असे ते म्हणाले व संधी दिल्या बद्दल नूतन अध्यक्ष आमदार रोहीत पवार व सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.