Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनांदेडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न...माजी सैनिक बलजीतसिंघ बावरी यांनी...

नांदेडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न…माजी सैनिक बलजीतसिंघ बावरी यांनी वाचविले प्राण…

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेड येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड हे पोलीस युनिफॉर्मवर असताना त्यांनी आज दुपारी गोवर्धन घाट नदी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु सुदेैवाने तेथे उपस्थीत असलेले सरदार बलजीतसिंघ बावरी यांनी तात्परता दाखवत त्यांना नदीतुन बाहेर काढले.

दरम्यान वजीराबाद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या राठोड यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले असून त्यांच्या परिवाराला कळविण्यात आले आहे. नदीत उडी घेण्याचे नेमके कारण याचा शोध पोलीस घेत आहेत.पोलीस उपनिरीक्षक राठोड यांचे प्राण वाचविल्याबद्दल माजी सैनिक बावरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: