राजु कापसे
रामटेक
काल दि.12/08/2022 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा.आ.श्री. नाना भाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वी वर्षपूर्ती निमित्त ”आजादी गौरव पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुण व युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व, त्याग व बलिदान याची अनुभुती होण्याकरिता व भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त आजाद गौरव पदयात्रे चे शुभारंभ आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 नरखेड येथील राष्ट्रपिता मा. महात्मा गाँधी जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन झाली, त्यानंतर काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवणी आणि रामटेक येथे येऊन पोहचली.
या पदयात्रेत मा.आ.श्री. सुनील बाबू केदार (माजी मंत्री, महा.राज्य), मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) , मा.आ.श्री. अभिजित दादा वंजारी, मा.सौ. रश्मीताई बर्वे (अध्यक्षा, जिल्हा परिषद, नागपूर), सौ.सुमित्रा ताई कुंभारे ( सदस्य जिल्हा परिषद नागपुर ).मा.कु.कुंदा ताई राऊत मा.चंद्रपालजी चौकसे , सौ.शांताताई कुंभरे ( जिल्हा परिषद सदस्य ) व तसेच कार्यक्रमाचे आयोजन रामटेक काँग्रेस कमेटी मार्फत मा.श्री.दुधरामजी सव्वालाखे ( जिल्हा परिषद सदस्य नागपुर ) , मा.दामोधरजी धोपटे अध्यक्ष ( रामटेक शहर काँग्रेस कमेटी ) , मा.कैलासजी राऊत अध्यक्ष ( रामटेक तालुका काँग्रेस कॅमेटी )
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्थाविक भाषण मा.श्री दुधरामजी सव्वालाखे साहेबानी केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायतचे सर्व नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, इंटक, एन एस यु आय, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, इतर मागास वर्ग व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शुभचिंतक आणि नागरिक बंधू भगिनी सहभागी होते.