Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayअकोला | म्हणूनच तिने नवऱ्याचा काटा काढायचे ठरवलं...अन् रचला असा कट पण...

अकोला | म्हणूनच तिने नवऱ्याचा काटा काढायचे ठरवलं…अन् रचला असा कट पण शेवटी सर्व उघड झालंच…

अकोला जिल्ह्यातील पुंड या गावात आपल्याच नवऱ्याच्या हत्येची सुपारी देत त्याची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले असून सचिन बांगर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून हत्येतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुंडा या गावांत काकड परिवार राहत होता याचं परिवारातील कंचन हिचा विवाह पातूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पास्टूल येथील सचिन घमरावं बांगर याच्याशी अंदाजे 3 वर्षा पूर्वी झाला होता त्यांना दोन मुलं आहेत, पण पतीला दारूची लत लागली कशी भरल्या संसाराला ग्रहण लागले.

सचिन बांगर हा रोज दारू पियुन कंचला मारहाण करीत असे, शारीरिक त्रास सहन न झाल्याने कांचन ने आपले सासर सोडून पुंडा येथे आपल्या माहेर गाठले व तेथे राहू लागली पण सचिन हा दर दोन तीन दिवसा आड तेथे जाऊन दारूच्या नशेत वाद घालत होता आता आपल्या नवऱ्याचा कायमचा काटा काढायचा म्हणून कांचन ने कट रचला….

सचिन च्या जाचाला कंटाळलेल्या कांचन ने आपल्या पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट तर रचला पण एकट्याने हा कट पूर्णतःवास नेणे अशक्य असल्याचे लक्षात येताच अजून कोणाची तरी मदत घ्यावी लागेल या हेतून गावातील तिचाच शेजारी राहणाऱ्या डिगांबर प्रल्हाद मालवे यास 30 हजार रुपयाचे आमिष देऊन आपल्या पतील कायमचा संपविण्याची जणू सुपारीच दिली.

दि २८ डिसेंबर रोजी सकाळी ०८/०० पुंडा तु बांबर्डा रोडवर एका इसमाचा मृतदेह व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेवुन लटकलेला आढळून आल्याची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली क्षणाचाही विलंब न करता पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असता एका इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर युवकाचे नाव सचिन बांगर याचा असून याची सासर वाडी पुंडा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

प्रथमदर्शनीय पाहता सदर युवकांनी आत्महत्या अंदाज वर्तविण्यात येत होता पण पोलिसांनी मृतदेहाची बारीक तपासणी केली असता सचिन याच्या पायाला मार असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून सचिन बांगर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोच्च रुग्णालया येथे पाठविला.

दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मनात शंका निर्माण झाल्याने त्यांनी त्वरित त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली तपास करीत असताना सचिन बांगर याची बायको कंचन सचिनची सखोल विचारपूस केली असता तिने सचिन बांगर हा तिचा तिला दारू पिवून खुप शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याने तिने गावातीलव शेजारी राहणारा डिगांबर प्रभाकर मालवे यास ३०,००० रुपयाचे आमिष दाखवून याचा हत्या घडवून आणण्यासाठी प्रलोभन दिले.

आपले पतीचा प्रथम तिच्या राहत्या घरी घरी दारीने गळा आवळून खुन केला व त्यांनतर त्याचे प्रेत घरा बाहेरील मुलांचे व्यायाम करणाऱ्या खांबाला गळफास देऊन हत्या केल्याची कबुली दिली. दहीहंडा पोलिसांनी आपली सतर्कता दाखवत 24 तासाच्या आतच या हत्येचा छडा लावला असून दोन्ही आरोपी सीताफिने अटक केली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत तसेच अकोट शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात तपासात उपनिरीक्षक अरुण मुंडे सह पोलीस उपनिरीक्षका शिल्पा धुर्वे, अरुण घोरमोडे, अनिल भांडे, निलेश गावंडे, रामेश्वर भगत प्रफुल दिंडोकार मनीष वाकोडे निलेश देशमुख भारती ठाकूर यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: