Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीजुगार वर छापा, एकूण १८१४० चा मुद्देमाल जप्त...

जुगार वर छापा, एकूण १८१४० चा मुद्देमाल जप्त…

हेमंत जाधव

शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम पाहुरजीरा येथे वेगवेगळ्या जागी जुगार नावाचा खेळ पैशाच्या हारजीत वर वरली च्या अकड्यांवर काही व्यक्ती खेळत होते पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पो ना सुधाकर थोरात यांनी छापा मारून भीमराव पाहुरकर, संतोष गुरेकर, शैलेश बेलोकार, शेख मझहर असे आरोपी जुगार खेळत होते,

आरोपी कडे मोबाईल, वरली च्या चिठ्या, पेन आणि रोकड असा एकूण 18140 रु चा मुद्देमाल मिळून आला पो ना सुधाकर थोरात यांचे फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध जलंब पो स्टे येथे 316/2022 क, 317/2022क 12 (अ) मु जु का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ची कार्यवाही सारंग आव्हाड जी पो अधीक्षक बुलढाणा, अपर पो अधीक्षक अशोक थोरात, यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पो अधिकारी अमोल कोळी यांचे आदेशाने पो ना सुधाकर थोरात व योगेश कुवांरे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: