कलासृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन ही संस्था हौशी, नवोदित, आणि कलेत रस असणाऱ्या व्यक्तींना कलामंच उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य करत आहे.त्याच उद्देशाने
कलासृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन व स्वरधुंद म्युझिकल इव्हेंट्स मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टपैलू कलाकार स्व किशोर कुमार यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त संगीतमय कराओके कार्यक्रम राधा मंगलम मुर्तीजापुर येथे पार पडला.
सर्वप्रथम पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून किशोर कुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. आपल्या मनोगतात या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम कोल्हाळे (संगीत शिक्षक) यांनी किशोर कुमार यांच्या आठवणीला उजाळा देऊन प्रेक्षकांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश इंगळे (अष्टपैलू कलाकार) यांनी किशोर कुमार यांचे वर्णन करून किशोर कुमार हे विविध क्षेत्रातील कलाकार होते आणि त्यांनी उत्तम प्रकारे आपली कला प्रामाणिक पणे जोपासली आहे. किशोर कुमारची युडलिंग अजूनही कला रसिकांना मोहित करते असे त्यांनी आपल्या मतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गझलकार, संदीप वाकोडे ,संजय गोपनारायण हे होते . पाहुण्यांच्या हस्ते कलाकार व सादरकर्त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटक सुरेश इंगळे यांच्या सुरेल आवाजात “ये शाम मस्तानी” या गाण्यांनी झाली व त्यानंतर एक से बढकर एक किशोर कुमार यांचे फिल्मी दुनियेत गाजलेले शानदार गीत सादरकर्त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत आणि दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या समोर मांडले व प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवले. सुनील डाबेराव(महसूल मंडळ अधिकारी) व अपर्णा गोल्डे यांनी युगल गीत “परदेशिया ये सच पिया” या गीताने रंगीन छाप टाकली.
अर्जुन बलखंडे (शिक्षक) व वृषाली मुंजेकर यांच्या युगल गीत “गोरे रंग पे इतना गुमान कर” या गितावर प्रेक्षकांनी जल्लोष केला. संस्थापक अध्यक्ष कल्पक कांबळे यांनी “बने चाहें दुश्मन जमाना हमारा” या गिताने मैत्री बद्दल प्रेम प्रकट केले. गझलकार,मिलिंद इंगळे व योगिनी ननीर यांनी युगल गीत “आंखो में काजल है” या गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रताप वानखडे (मुख्याध्यापक) यांनी एकल गीत “जिंदगी एक सफर है सुहाना” या गिताने उत्साहीत केले. संजय वाघ (हेडकॉन्स्टेबल) यांनी”तेरे चेहरे पे जादू है” या गीताने दमदार मनोरंजन केले. बंडू ईश्वरे(चित्रकार) यांनी” प्यार दिवाना होता है” या मस्तीभरे गीताने मने जिंकली. व किशोर भगत (चित्रकार) यांनी “चला जाता हूॅं किसी के धून मैं” या गिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
कलासृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भूषण कांबळे व सचिव मिलिंद इंगळे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या विनोदी ढंगात नकलाकार संजय शिंदे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलीम शेख ,सुमेध मेश्राम, प्रवीण फुले, समाधान इंगळे व विष्णू लोडम यांचे विशेष सहकार्य होते.
शेवटी “चलते चलते मेरे ये गीत याद रखना” हे गीत कलाकारांनी सामुहिक रित्या सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.