Sunday, December 22, 2024
Homeराजकीयदोन दशकापासून रामठी येथे दिलेश ठाकरे गटाची सत्ता...गावाला मिळणार काटोल विधानसभा प्रमुख...

दोन दशकापासून रामठी येथे दिलेश ठाकरे गटाची सत्ता…गावाला मिळणार काटोल विधानसभा प्रमुख विकासपुरुष चरणसिंग ठाकूर यांनी साथ…

नरखेड तालुक्यातिल नेहमी चर्चेत असणारी ग्राम पंचायत रामठी येथे भाजप तालुका महामंत्री दिलेश ठाकरे गटाने सत्ता कायम ठेवली तसेच लागुन असलेली आरंभी सुद्धा भाजपने जिंकली त्यात दोन्ही गावाचे भाजप पक्षाचे निवडणु, प्रभारी दिलेश ठाकरे होते हे विशेष सन 2007 पासून सतत सत्ता कबीच ठेवुन दिलेश ठाकरे यांचे वर्चस्व निर्वीवाह ठेवले आहे.

2014 पर्यंत टँकर ग्रस्त व महाराष्ट्रातून सर्वात जास्त दरडोई खर्च शासनास रामठी येथे झाला होता,परंतु आज गावात विविध विकास कामासोबत विष्याचे नवेच वापराचे पाण्याची सुविधा झाल्याने लोकांनी चौथ्यांदा विश्वास ठेवून दिलश ठाकरे गटाची सत्ता कायम ठेवली.

माझ्या गावप्रति असलेले माझे कर्तव्य आणि 20 वर्षापासून जनसेवा हिच ईश्वर सेवा हा ध्यास मनात ठेवून जनसेवेचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो,विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण करूनही, मी कधी थांबलो नाही,गावचा विकास झाल्याने जनतेने विश्वास ठेवला व जनतेच्या सेवकाला सेवा करायची पुन्हा संधी दिली.. या कर्जाची परतफेड मी करूच शकत नाही,पण गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असा शब्द देतो.

दीलेश ठाकरे, भाजप महामंत्री नरखेड.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: