सांगली – ज्योती मोरे
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये बहिण भावाच्या अतूट प्रेमाचा अर्थातच रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री.अविनाश पाटील (पोलीस निरीक्षक कुपवाड एमआयडीसी) तसेच कु.दिपाली कोळेकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक कुपवाड एमआयडीसी), श्री गव्हाणे उपस्थित होते तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधीच्या व इतर विद्यार्थिनींच्या वतीने श्री अविनाश पाटील राखी यांना बांधण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की रक्षाबंधनाचा हा सण म्हणजे बहिण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस पण.
आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे हे कोणत्याही नात्याची अपेक्षा न करता सदैव आपल्या कामात कर्तव्यात मग्न असणारे कर्तव्यदक्ष आणि अपराध सिद्धी पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक श्री अविनाश पाटील. आणि त्यांच्याच बरोबर पाटण सारख्या एका ग्रामीण भागातून आलेल्या पण आपल्या स्वकर्तृत्वावर सांगली जिल्ह्यात नाव कमावलेल्या कु.दिपाली कोळेकर. अल्पवधीच्या कालावधीतच कुपवाड मधील वाढता गुन्हेगारीचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
दिपाली कोळेकर आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या शाळेतील विद्यार्थिनींनी देखील आयपीएस, पीएसआय या यासारखे शासकीय अधिकारी देखील व्हावेत पण त्याचबरोबर एक प्रसिद्ध उद्योजिका देखील निर्माण व्हाव्यात.मार्कांच्या मागे न लागता गुणवत्ता प्राप्त असे शिक्षण घ्यावे.मुलींच्या साठी सर्वप्रथम आई आपली मैत्रीण असते तर दुसरी मैत्रीण आपली शिक्षिका असते.त्यामुळे वेळोवेळी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे मार्गदर्शन घ्यावे.मुलींसाठी व महिलांसाठी अनेक विशेष कायदे व कलमे आहेत याचीही माहिती करून घ्यावी.विचारपूर्वक एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यावा.
श्री अविनाश पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्याला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत सर्वांनी आपल्या उंच घराच्या ठिकाणी तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा याबद्दल माहिती दिली.पण आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोक्ते ते आपल्या बालपणीच्या आणि शालेय जीवनातच.
इंटरनेटच्या काळात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे मोबाईलचा वापर करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि चांगल्या कामासाठी करावा यासाठी कोणतेही ॲप डाऊनलोड करत असताना ज्याची पूर्णपणे माहिती आहे अशा जबाबदारी व्यक्तीकडून घ्यावी.
शाळेत येत असताना वाहतुकीचे नियम पाळावेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते.पोलीस स्टेशनमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही वाईट कामासाठी येते असे नसते.आपली वागणूक आपले वर्तन हे नेहमी आदर्श घेण्यासारखे असावे.आपले ध्येय निश्चित करून आपण प्रयत्न केल्यास आपल्याला यश हमखास मिळतेच.शाळेतील सर्व मुलींनी सर्व मुलांना राख्या बांधण्यात आल्या आणि विशेष करून या सर्व राख्या राखी तयार करणे या शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आलेल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ ललिता गोंडाजे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.