Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingआता तर स्मृती इराणीचा भगव्या ड्रेसवरचा 'हा' जुना व्हिडीओ व्हायरल झाला...

आता तर स्मृती इराणीचा भगव्या ड्रेसवरचा ‘हा’ जुना व्हिडीओ व्हायरल झाला…

न्युज डेस्क – शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या बिकिनीवरून तिला ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जातेय. यामुळे सोशल मिडीयावर दिवसभर शाहरुख खान ट्रोल झालाय, दरम्यान स्मृती इराणीचा एक video सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होतोय.

पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. या गाण्यातील एका सीनदरम्यान दीपिका केसरी रंगाच्या बिकीनीत पहायला मिळतेय. यावरूनच मोठा वाद निर्माण झालाय. पठाण चित्रपटातून सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जातोय. अश्यातच कॅबिनेट मंत्री स्मृती इराणीचा 1998 मधील एक video सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

यामध्ये जेव्हा स्मृती इराणी यांनी फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी भगव्या रंगाचा ड्रेस घातला असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे म्हणून त्यांनाही ट्रोल केल जातेय.

बेशरम रंग हे गाणं विशाल-शेखर या जोडगोळीने संगीतबद्ध केलं असून कुमार यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: