Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayसमृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकेनंतर आता तर गोळीबार...पहा नेमकं काय घडलं? 

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकेनंतर आता तर गोळीबार…पहा नेमकं काय घडलं? 

ऋषिकेश सोनवणे
औरंगाबाद

औरंगाबाद: समृद्धी महामार्गावर रोज अपघाताच्या घटना पुढे येत असताना आता सावंगी जवळील बोगद्याजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.  महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून समृद्धी महामार्गाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र, यावरील प्रवासापेक्षा इतर घटनांमुळेच महामार्ग चर्चेत येत आहे. कधी बैलगाड्या महामार्गावर धावत आहे, तर कुठे हरण पळत आहे. शिवाय महामार्ग सुरु झाल्यापासून यावर रोज अपघाताच्या घटना घडत आहेत.

आता तर महामार्गावर एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तरुण उभा असलेल्या ठिकाणी पाठीमागे एक बोगदा दिसतोय. यावरून हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचा अंदाज आहे. हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. जीपसमोर उभा राहून तो हवेत गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे. 

सौजन्य – सोशल मिडिया
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: