Saturday, September 21, 2024
Homeराज्यकाटोल सभापतींचा विद्यार्थी प्रगती उपक्रम, शनिवारला असणार दप्तरमुक्त शाळा...

काटोल सभापतींचा विद्यार्थी प्रगती उपक्रम, शनिवारला असणार दप्तरमुक्त शाळा…

पं.स.काटोल सभापती संजय डांगोरे यांचे आदेश…

नरखेड – अतुल दंढारे

काटोल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, जि.प.विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही मागे राहू नये म्हणून काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी ‘विद्यार्थी प्रगती सभापती उपक्रम’ सुरू केलेला आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणारे उपक्रम शाळेत घेणे अपेक्षित आहे.यात प्रत्येक शनिवार काटोल तालुक्यात ‘दप्तरमुक्त शाळा’ भरणार आहे.शनिवार ला शाळेत भाषण, मुलाखत,श्रुतलेखन,संख्यावरील क्रिया,संभाषण कौशल्य, शाब्दिक व मैदानी खेळ, विविध स्पर्धा, महापुरुषाच्या जयंती कार्यक्रम,इंग्रजी शब्दसंपत्ती वाढविणारे उपक्रम तसेच कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण तासिका घेण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत नुकतीच गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के व शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर व सर्व केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे काटोल तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळेत ‘विद्यार्थी प्रगती सभापती उपक्रम’ सुरू झाला.

विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या आत शिक्षण मिळू नये तर निसर्गाच्या कुशीत हसत-खेळत,मुक्तपणे, तणावविरहीत शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संजय ज्ञानेश्वरजी डांगोरे सभापती, पं.स.काटोल

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: