नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं. 149/2017 कलम 302 भा द वि गुन्हयातील आरोपी आकाश बालाजी बारसे वय 23 वर्ष रा पांगरी ता. जि. नांदेड हा कोरोना काळात शिक्षा भोगत होता. त्यास कारागृहातुन आकस्मीक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. सदर आरोपी रजा संपल्यानंतर कारागृहात न जाता फरार झाला होता.
फरार आरोपीविरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 621/2022 कलम 224 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद शिक्षाबंदी यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथक तयार करून दिनांक 12 डिसेंबर रोजी स्थागुशाचे पथक नांदेड ग्रामीण उप विभागात पेट्रोलींग करीत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 149/2017 कलम 302 भा द वि गुन्हयात औरंगाबाद कारागृहात शिक्षा भोगत असताना सुटीवरुन फरार झालेला शिक्षाबंदी नआकाश बालाजी बारसे रा. पांगरी ता. जि. नांदेड हा मौजे थुगांव येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन शिक्षाबंदी आरोपी आकाश बालाजी बारसे वय 23 वर्ष रा. पांगरी पो. विष्णुपुरी ता. जि. नांदेड यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 621/2022 कलम 224 भा. दं. वि. या गुन्हयाचे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक,भोकर खंडेराव धरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व्दारकादास चिखलीकर पोउपनि / दत्तात्रय काळे, पोकॉ/ विलास कदम, गणेश धुमाळ, तानाजी येळगे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.