Monday, November 18, 2024
Homeराज्यशितलवाडी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा कार्यक्रम...

शितलवाडी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा कार्यक्रम…

११ ते १८ डिसेंबर पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन…

नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहण…

रामटेक – राजू कापसे

शहरालगत असलेल्या शितलवाडी येथील भाग्यश्री कॉलनी येथे आज दि. ११ डिसेंबर पासुन संगीतमय श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कथा प्रवक्ता व श्री जोतिष वास्तु परम गुरु आचार्य श्री सच्चिदानंद महाराज हे असुन नागरीकांनी सदर कार्यक्रमाचा आवर्जुन लाभ घेण्याचे आवाहण आयोजकांनी केलेले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा, रविवार दि. ११ डिसेंबर ला सकाळी १० वाजता कलश यात्रा, १२ डिसेंबर ला सुकदेव आगमण व वराह अवतार, १३ डिसेंबर ला नरसिंह अवतार व वामन चरीत्र, १४ डिसेंबर ला श्रीकृष्ण जन्मोत्सव, १५ डिसेंबर ला बालचरित्र व गोवर्धन पुजा, १६ डिसेंबर ला रुक्मिणी विवाह, १७ डिसेंबर ला सुदामा चरीत्र आणि १८ डिसेंबर ला दुपारी १ वाजता पुर्णाहुती व महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथींमध्ये आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक,

पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे, जि.प. सदस्य सतीश डोंगरे, जि.प. सदस्य संजय झाडे, पं.स. उपसभापती नरेंद्र बंधाटे, माजी उपसभापती गज्जु यादव, सरपंच शितलवाडी ग्रामपंचायत मदन सावरकर, उपसरपंच विनोद सावरकर तथा ग्रामविकास अधिकारी अनील आगरकर प्रामुख्याने उपस्थित राहाणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान पंचकमेटी भाग्यश्री कॉलनी परसोडा तर्फे करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: