Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayपिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाईफेकली...शाई फेकणारा पोलिसांच्या ताब्यात...Video

पिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाईफेकली…शाई फेकणारा पोलिसांच्या ताब्यात…Video

पिंपरी चिंचवड : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने थेट तोंडावर शाई फेकली असून यामध्ये चंद्रकांत पाटील जमिनीवर पडता पडता वाचले. तर शाई फेकणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले, चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. विरोधी पक्षासह काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या.

आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करत पाटील यांचा निषेध केला. दरम्यान,आज दुपारी ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्तेही येथे जमा झाले होते. येथे शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजपा पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

संबंधित व्यक्तीने थेट तोंडावर शाई फेकल्याने चंद्रकांत पाटलांचा समतोल बिघडला, हे जमिनीवर पडता-पडता थोडक्यात बचावले. हा प्रकार घडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडलं आहे. यावेळी संबंधित व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणाही संबंधित व्यक्तीने दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: