Monday, November 18, 2024
HomeSocial Trendingआता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील याचं वादग्रस्त विधान...काय म्हणाले?..जाणून घ्या...

आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील याचं वादग्रस्त विधान…काय म्हणाले?..जाणून घ्या…

राज्यातील भाजपा नेत्यांनी आपल्याच महापुरुषांची बदनामी करण्याची शृंखलाच सुरु केली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलच सुनावलं आहे.

आई-बापापेक्षा मोदी-शहा यांना मोठे मानणारे चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं वादग्रस्त विधान पैठण येथील कार्यक्रमात केलं आहे. पुढे बोलत असताना म्हणाले, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना पाटील यांनी दुपट्टा समोर केला. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.

या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळवीर आहेत. हे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले आहे. महापुरुषांनी लोकवर्गणीतून शाळा उभारल्या. स्वतः जवळचापण पैसा खर्च केला. त्यांनी काही भीक मागितली नाही. भीक म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या महापुरुषांचा अपमान केला. नवीन शाळा काढतात. त्यांना तुम्ही शाळा सुरू करण्यासाठी भीक मागा, असा सल्ला दिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: