Sunday, December 22, 2024
Homeराज्यखासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दि १ डिसेंबर ते ६ डिसेंबर...

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दि १ डिसेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत दिव्यांग सप्ताह…

खामगाव – बुलढाणा लोकसभेचे खासदार तथा केंद्रिय माहिती व तंत्रज्ञान समिती अध्यक्ष भारत सरकार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच जागतिक दिव्यांग दिनाचे निमीत्याने दिव्यांगांना आधार देण्याकरिता दिनांक 01/12/2022 ते 06/12/2022 पर्यन्त दिव्यांग सप्ताह आरोग्य तपासणी करत त्यांना आवश्यक असेल्या ऊपयुक्त साहित्याचे नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

त्याचा समारोप आज मुकबधिर कर्णबधिर विद्यालय आमडापुर नाका खामगाव येथे झाला खामगाव येथे 1300 च्या जवळपास दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला या शिबाराला शेगाव,संग्रामपुर,जळगाव जामोद,नांदुरा येथिल दिव्यांग बांधवांनी आपली साहित्याकरिता नोंदणी केली.

खामगाव येथे शिवसेना बाळासाहेब ऊपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख सुरेश वावगे,राजेश बघे,ईंदुताई राणे,प्रदिप ब्राम्हणकर,बंडु चिकटे,विक्की सारवान,यांनी अथक प्रयत्न करत संपुर्ण शिबीर पार पाडले,या शिबीराला आमदार आकाशदादा फुंडकर,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,रामा धारकर,संतोष लिप्ते,सा.दिव्यांग शक्ती संपादक व विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,

अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष मोहमंद शकिल,प्रहार अपंग संस्थाचे क्षत्रुघन ईंगळे खासदार जाधव यांचे स्विय सहाय्यक पप्पुभाऊ जवंजाळ,समाज कल्याण अधिकारी मनोज मेरठ,मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक अग्रवाल सर जगताप सर व त्यांचे सहकारी आदी ऊपस्थित होते,

सदर कार्यक्रमामध्ये ज्या दिव्यांग बांधवांना ऊपयुक्त साहित्य मंजुर झाले आहे त्याचे वितरण दिड ते दोन महिन्यात मा.खासदार प्रतापराव जाधव यांचे हस्ते होईल त्याची तारिख कळविण्यात येईल असे शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: