Sunday, November 17, 2024
Homeराजकीयनरखेड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत भाजपाच्या कोट्यात...

नरखेड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत भाजपाच्या कोट्यात…

अंबाडा (देशमुख) ग्रामपंचायत निवडणुकीत ट्विस्ट बिनविरोध झालेल्या सरपंचासह सदस्य भाजपाच्या गोटात

नरखेड तालुक्यात २२ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. २) अंबाडा (देशमुख) येथे सरपंचपदासह सात सदस्य पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने येथील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात सरपंच आणि सातही सदस्य आपल्या गटाचे असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, सोमवारी तालुकास्तरावर उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर अंबाडा (देशमुख) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध झालेल्या प्रमिला बापूराव बारई यांनी भाजप गटाला पाठिंब्याचे पत्र जाहीर केले.

प्रमिला बारई यांच्यासह अंबाडा येथे विजय गुंजाळ, नारायण सरियाम, अनिल ठाकरे, सोनू रेवतकर, कविता फुले, इंदू कुमरे, मंजू उईके हे सदस्यपदी बिनविरोध झाले आहे.
सोमवारी बारई या बिनविरोध सदस्यांसह भाजपचे काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. यात बारई यांनी भाजप नेतृत्वावर विश्वास
दर्शवीत पाठिंब्याचे पत्र दिले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री किशोर रेवतकर, जिल्हा महामंत्री देविदास कठाने, जि. प. सदस्या पारबता काळबांडे, निवडणूक प्रभारी स्वप्निल नागापुरे, माजी नगराध्यक्ष होते. तानाजी थोटे, दिलीप तांदळे, डॉ. चेतन बारई, कमलाकर ठाकरे, श्याम नेहारे, महेंद्र नासरे, वीरेंद्र नासरे, गजानन ठाकरे, रामभाऊ सर्याम, चंदू काळबांडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: