न्युज डेस्क – श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी 3 डिसेंबर रोजी ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले छायाचित्र शेअर करून मंदिर बांधकामाच्या प्रगतीची माहिती भाविकांना दिली. राम मंदिराचे गर्भगृह आणि पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून आता त्यावर कोरीव खांब उभारले जात असल्याचे चित्र दिसत आहे. जानेवारी 2024 पासून भाविक रामललाच्या दर्शनाला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कालमर्यादा लक्षात घेऊन बांधकाम केले जात आहे.
25 नोव्हेंबरला काही फोटो रिलीज झाले. ज्यामध्ये मंदिराच्या बांधकामासाठी कोरीव खांब बसवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी खांब कोरण्याचे काम 1992 पासून सुरू आहे. आता त्यांचा वापर केला जाईल. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेळोवेळी मंदिर उभारणीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.