रामटेक 🙁 प्रतिनिधी )
दिनांक ०७/०८/२०२२ ला पारशिवनी येथे मा.ना.श्री. सुनीलबाबु केदार साहेब माजी मंत्री तथा आमदार सावनेर व मा. श्री. चंद्रपाल चौकसे साहेब अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन, महाराष्ट्र यांचा शुभहस्ते पारशिवनी तालुक्यातील १० वी व १२ वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नागपुर जिल्हा परिषदेचा अध्यक्षा सौ. रश्मिताई बर्वे उपस्थित होत्या. व उपस्थित विद्यार्थ्यांना कॅरिअर मार्गदर्शन डॉ. सुरेश जाधव फॅसिलिटी फॉर आय.ए.एस. माईंड पॉवर ट्रेनर अँड मोटिवेशन स्पीेकर यांनी केले.
यावेळी उपस्थीत जि.प.सदस्य राजकुमार कुसुंबे ,जि.प.सदस्य सौ. अर्चना दीपक भोयर,पं.स.सभापती सौ. मीनाताई कावळे, उपसभापती चेतन देशमुख, प.स.सदस्य सौ. मंगला निंबोने ,प.स.सदस्य संदीप भलावी ,प.स.सदस्य तुलसी दियेवर ,प.स.सदस्य निकिता भारद्वाज ,प.स.सदस्य करुणा भोवते , दयारामजी भोयर, श्रीधर झाडे, निखिल पाटील, प्रदीप दियेवर, प्रेम कुसुंबे, प्रकाश कामडे, सचिन आमले, मोहन सहारे, साधना दडमल, प्रकाश कामडे, विद्याताई चिखले, संदीप गजभिये, सेवक मेश्राम, नरेश ढोने, भुजंग ठाकरे, कलिराम उईके, कमलाकर कोठेकर, मिथुन उईके, पुरुषोत्तम येवले, इंद्रपाल गोरले, मोहन कोठेकर व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, व १० वी व १२ वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.