Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsBreaking | अफगाणिस्तान मधील मदरशात बॉम्बस्फोट…१६ जण ठार तर २४ जण घायल…ऐबक...

Breaking | अफगाणिस्तान मधील मदरशात बॉम्बस्फोट…१६ जण ठार तर २४ जण घायल…ऐबक शहरातील भीषण घटना…

काबूल : अफगाणिस्तानच्या ऐबक शहरात बुधवारी बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण आहे की, यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलीस छावणीत परिवर्तीत झाला आहे. तपास यंत्रणा घटनास्थळी पुरावे शोधत आहेत. ज्या ठिकाणी बसचा स्फोट झाला, तेथे लोकांची गर्दी असून आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. मोठा आवाज होऊन स्फोट झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावत होते. आसपासच्या लोकांनी जखमींना मदत केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: