सांगली – ज्योती मोरे
सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम / इंग्रजी माध्यम विजयनगर म्हैसाळ स्टेशन मध्ये आज वार्षिक क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली . या स्पर्धेचे उद्घाटन रौप्य पदक प्राप्त मदन परशराम कोरवी यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात क्रीडा ज्योत आगमन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली . प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री सुनिल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच सुरज फाउंडेशन संचालिका सौ. संगिता पागनीस यांचा सत्कार इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक श्री. अस्लम सनदी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हजर असलेले प्रमुख पाहुण्याचे यांचे वडील कृषी अधिकारी श्री परशराम कोरवी व श्री. पी. के. देशपांडे सर यांचा ही गुलाब फूल देवून सत्कार आमच्या शाळेतील शिक्षक नितीन बनसोडे व मेघा मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मदन कोरवी म्हणाले की खेळाचा सराव दररोज केला पाहिजे, तसेच खेळामुळे होणारे फायदे व खेळाचे महत्व सांगितले . त्यांनी स्वतः कशा प्रकारे खेळ खेळला याविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . कृषी अधिकारी परशराम कोरवी यांनी आपले मनोगत मानले . तसेच आमच्या सुरज फाउंडेशनच्या संचालिका सौ. संगिता पागनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रास्ताविक मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री. सुनिल चौगुले यांनी केले. आभार श्री. अस्लम सनदी यांनी आभार मानले. सूत्र संचालन सौ.बबिता कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचे पूजन करून कब्बडी खेळाचे नाणेफेक करून खेळ सुरु करण्यात आला . सदर स्पर्धा ह्या २ दिवस चालणार आहेत यामध्ये लहान गट ते इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थी सहभाग असणार आहे.
वैयक्तिक स्पर्धा – लिंबू चमचा, बेडूक उडी, गोळा फेक, धावणे तर सांघिक स्पर्धेमध्ये – रस्सी खेच, लंगडी पळती , खो खो व कबड्डी असे खेळ प्रकार असणार आहेत . यावेळी कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक – सौ. तनुजा पाटील , कु. गायत्री शिंदे , सौ. स्वाती माळी. तसेच पालक व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सुरज फाउंडेशन चे संस्थापक मा. श्री प्रविणजी लुंकड , सेक्रेटरी मा. श्री. कामत सर, संचालिका सौ. संगिता पागनीस, कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .