Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या...पोपटखेड वनातील...

आकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड वनातील सनसनाटी घटना…

संजय आठवले, आकोट

मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील पोपटखेड बिटमध्ये कार्यरत वनरक्षक पत्निने परतवाडा येथे कार्यरत वनरक्षक प्रियकराचे मदतीने ऊमरखेड येथिल भाऊसाहेब माने कृषी विद्यालयात कार्यरत प्राध्यापक पतीची गळा आवळून हत्या केल्याची सनसनाटी घटना पोपटखेड बिटमध्ये घडली आहे. याप्रकरणी या खूनी लैलामजनूवर दिग्रस पोलिसानी गून्हा दाखल करुन त्याना न्यायालयात हजर केले असता त्याना ११ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान दिग्रस पोलिसानी सदर खूनी पत्निस आकोट येथिल तीचे घरी चौकशीकरिता आणले होते. पूढे अधिक चौकशीकरिता ह्या खूनी आशूक माशूकाना आकोट व पोपटखेड बिटमध्ये आणले जाणार आहे.

याबाबत सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार धनश्री देशमूख ही महिला वनरक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०२० मध्ये मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील पोपटखेड बिटमध्ये रुजू झाली. फेसबूकच्या माध्यमातून ऊमरखेड जि. यवतमाळ येथिल भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख याचेशी तिची ओळख झाली. गोड गोड बोलण्याचे खतपाणी घातल्याने ह्या ओळखीचं रोपटं चांगलच बहरलं. आणि दोघांचा मंगल परिणय संपन्न झाला. धनश्री ही आकोट शहरातील शाहीन कॉलोनी परिसरात घर भाड्याने घेवून राहत होती. तेथे तिचा पती सचिन हा सुटीचे दिवशी नियमितपणे येत असे. परंतु काही दिवसांपासून त्याला धनश्रीच्या वर्तनाबाबत संशय येवू लागला होता. दि.२९ जुलै रोजी सायंकाळी अचानक तो तिचे घरी आला. तेंव्हा धनश्री घरी नव्हती. रात्रीचे दोन वाजता ती घरी परतली. सचिनने याबाबत पृच्छा केली असता आपण गस्तीवर गेलो असल्याचे तिने सांगितले. पण वास्तवात त्या दिवशी गस्तच नव्हती. दि.२८ जुलैला भरपावसात गस्त घातल्याने सर्व कर्मचारी थकलेले असल्याने दि. २९ जुलैला गस्त रद्द केली होती. विशेष म्हणजे २८ जुलैच्या गस्तीत धनश्रीही सामिल होती. त्यामूळे धनश्री खोटे बोलत असल्याचे ओळखल्याने सचिनचा व तिचा कडाक्याचा वाद झाला.

त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे दि. ३० जुलै रोजी दुपारी पोपटखेड बिटमधिल वनकर्मचारी कळसकार ह्याला सचिन देशमूख हा छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील आकोट आकोला मार्गालगतच्या गजानन भोजनालयानिकट आढळला. एकमेकांशी विचारपूस केल्यावर आपण जेवणाचा डबा घेण्यासाठी आलो असल्याचे सचिनने सांगितले. ह्यावरुन धनश्री व सचिन दरम्यान धूसफूस सुरु असल्याचे लक्षात येते. त्यानंतर त्या दिवशी दोघांमध्ये बराच कलह झाला असल्याची दाट शक्यता आहे. तिसरे दिवशी म्हणजे ३१जुलै रोजी सचिन व धनश्री पोपटखेट बिटमध्ये पोचले. धनश्रीच्या सहकारी कर्मचा-यांशी काही बाबींची शहनिशा करण्याकरिता हे दोघे पोपटखेड बीटमध्ये गेल्याची शक्यता आहे. हे सगळे घडत असताना त्या ठिकाणी परतवाडा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेला धनश्रीचा प्रियकर शिवम चंदन बछले हा अकस्मात आला. सचिनशी त्याने चर्चा केली. तेथून हे तिघेही निर्जन स्थळी गेले. तेथे सचिन व शिवमची झटापट झाली. त्यात शिवमच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले. शिवमने सचिनचा गळा आवळला. त्यात सचिनचा अंत झाला. त्यानंतर धनश्री व शिवमने अपघाताचा बहाणा करुन सचिनचा मृतदेह रातोरात दिग्रस पूसद मार्गावरील सिंगद शिवारातील नाल्याच्या पूलाखाली फेकून दिला. आणि रातोरात दोघेही आकोट येथे परत आले. शिवम धनश्रीला तिचे घरी सोडून परतवाडा येथे परत गेला. या दरम्यान धनश्रीने सचिनचे मोबाईलवर संपर्क करुन शेवटच्या घटिकेपर्यंत आपण त्याच्या संपर्कात असाल्याचे भासविले. आपल्या मोबाईलमधून शिवमचे कॉल डिलिट केले. आणि आपण आकोट येथिल घरीच पूर्णवेळ असल्याचा आभास निर्माण केला.

१ ऑगस्ट रोजी घर घर तिरंगा योजने अंतर्गत वनविभाग परतवाडाने रॅलीचे आयोजन केलेले होते. त्यासाठी सर्व वनकर्मचा-याना हजर राहण्याचे आदेश होते. परंतु धनश्रीने सकाळी नऊ वाजता रजेचा अर्ज केला. त्यानंतर तिने सचिनचे कूटूंबियाना त्याचेबाबत विचारणा केली. त्यावेळी तो घरी पोचला नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून धनश्री सचिनचे घरी ऊमरखेड येथे गेली. त्याच दिवशी ईकडे पोलीसाना नाल्याचे पूलाखाली मृतदेह आढळला. त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसानी केले. तेंव्हा हातावर सचिन गोंदलेले आढळल्याने हा सचिन वसंतराव देशमूख असल्याचे सिद्ध झाले. हा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शव विच्छेदन अहवालात अनेक बाबी संशयास्पद वाटल्या. त्यामूळे सचिनचा चुलतभाऊ हर्षद नागोराव देशमूख ह्याने सचिनचा घातपात झाल्याची तक्रार नोंदवली. त्याआधारे तपास केला असता या प्रकरणात धनश्री व शिवमचा हात असल्याची माहिती समोर आली. म्हणून पोलीसानी परतवाडा येथे शिवमचा शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही. तो गत तिन दिवसाःपासून कर्तव्यावर आला नसल्याचे सांगण्यात आले.

ह्याचवेळी कळाले कि, शिवमने १ व २ ऑगस्ट या दोन दिवसांच्या रजेचा अर्ज ३ ऑगस्टला कार्यालयात नेला आणि हा अर्ज १ ऑगस्टपूर्वीच्या तारखेस आवक पूस्तिकेत नोंदवावा असे आवक लिपिकास सांगितले. परंतु ते गैरकायदेशिर असल्याचे सांगून त्या लिपिकाने त्या अर्जाची रितसर नोंद घेतली. पोलीस शिवमच्या शोधात असतानाच गुप्त माहितीवरुन पोलीसानी त्याला चिखलदरा येथिल रिसोर्टमधून अटक केली. त्यानंतर धनश्रीलाही अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघानाही न्यायालयात हजर केले असता त्याना ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान होणा-या तपासाकरिता या दोन्ही खूनी प्रियकर प्रेयसीला आकोट व पोपटखेड येथे आणले जाणार आहे. ही सारी कारवाई परिविक्षाधिन पो. अधि. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे स्थानिक गुन्हे शाखा प्रमूख प्रदिप परदेशी, दिग्रस ठाणेदार धर्मा सोनोने आणि त्यांच्या सहका-यानी पार पाडली.

धनश्री व शिवम यांचेबाबत अधिक माहिती घेतली असता, शिवम हा अविवाहित असल्याचे कळले. फेसबूकचे माध्यमातून सचिनशी संबंध येण्यापूर्वीपासूनच धनश्री व शिवम हे “हम साथ साथ है”च्या शपथा घेवून बसलेले होते. परंतु धक्कादायक म्हणजे धनश्रीच्या विलासी जाळ्यात सचिन, शिवम यांचेखेरीज अन्यही काही प्रेमात्मे फसले असल्याची सहकारी कर्मचा-ंमध्ये चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: