Wednesday, November 6, 2024
Homeगुन्हेगारीरायगड | दोन कंटेनर ट्रेलरचा अपघात…केमिकल वाहून नेणारे कंटेनर फुटल्याने केमिकल पसरले...

रायगड | दोन कंटेनर ट्रेलरचा अपघात…केमिकल वाहून नेणारे कंटेनर फुटल्याने केमिकल पसरले रस्त्यावर…

किरण बाथम
कोकण ब्युरो चीफ

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले व धुतुम गावाजवळ असलेल्या जेएनपीटी पळस्पे महामार्गांवर आज शनिवार दिनांक २६ रोजी दोन कंटेनर यांचा अपघात झाल्याने एक केमिकल कंटेनर जागेवरच उलटला.

उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४ ब वर अपघात झाल्याने, पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याचे पहायला मिळाले.

अपघातामध्ये कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. परंतु रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

केमिकलचा कंटेनर उलटल्याने त्यातून धुर बाहेर पडू लागले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन, अग्निशमन दल त्वरित घटना स्थळी दाखल झाले. कंटेनर मधून केमिकल धूर बाहेर पडत असल्याने या महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.

महामार्ग बंद ठेवल्याने जवळपास ५ किलोमीटर अंतर पर्यंत वाहमांच्या रांगा लागल्या होत्या.

सदर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली.

पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

उरण तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे. मुख्य रस्त्यावर वाहने वेडी वाकडे करून वाहने लावण्याचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर वाहने अवैध पणे वेडी वाकडी कसेही उभे केले जातात. त्यामुळे या मार्गावर अनेकदा लहान मोठे अपघात झालेले आहेत.

विविध सामाजिक संस्था संघटना यांनी या समस्या बाबत अनेकदा संप, आंदोलने केली, शासकीय पत्रव्यवहार केला तरीही परिस्थिती सुधारत नसल्याने या मार्गावर अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंगला प्रोत्साहन मिळत आहे. या समस्यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: