राज्यात गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल कोश्यारी यांनी २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलं आहे. यामुळे राज्यात पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई हल्याला आज रोजी ११ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्य आज 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्याचा दिवस असल्याने कोश्यारी यांनी चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सचिन सावंत यांनी ट्वीट लिहले…’अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते’…