नरखेड–25
नरखेड तालुक्यातील भारसिंगी तेथील जाम नदीच्या पुलावरून वरूड वरून नागपूरकडे जाणारा एमएच 40 सीएम 4286 क्रमांकाचा ट्रॅक भारसींगी येथील जाम नदीच्या पुलावरून खाली पडल्याने ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुभम रमेश पाटणकर वय वर्ष 28 रा. मांगोना ता. मुलताई जिल्हा. बैतूल असे जखमी झालेल्या ड्रायव्हर चे नाव आहे.
गुरवारी सकाळी ११ च्या सुमारास वरूड वरून नागपूरकडे जात असताना भारसिंगी येईल जाम नदीच्या पात्रात पुलावरून खाली ट्रॅक पाण्यात पडला. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचे त्याचे नियंत्रण सुटले व ट्रॅक पुलाखाली पडला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार मनोज चौधरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले व पाण्यात अडकलेल्या ड्रायव्हर ला पोलिस कर्मी दिनेश जोगेकर यांनी पाण्यात जाऊन त्या ड्रायव्हरचे प्राण वाचवले.
ड्रायव्हरला किरकोळ जखम झाली असून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले होते. ड्रायव्हर शुभम रमेश पाटणकर दारूच्या नसेत असल्यामुळे त्याच्या विरुध्द कलम 279, 337 भादवी सहकलम 184 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जलालखेडा पोलीस करत आहे.
पोलिसांने वाचवला एकाचा जीव.
भारसिंगी येथे गुरवारी सकाळी ११ च्या सुमारास जाम नदीच्या पुलावरून ट्रॅक पाण्यात पडला. ट्रॅक ड्रायव्हर गाडीच्या कॅबिन मध्ये पाण्यात अडकला होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस कर्मचारी दिनेश जोगेकर यांना ही गोष्ट दिसली असता त्यांनी लगेच पाण्यात जाऊन ड्रायव्हर चा जीव वाचवला.