Thursday, November 21, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर । बोगस ७/१२ तयार करून 'या' सोंगाड्या तलाठ्याने अल्पभूधारक शेतकऱ्याला गंडवलं…शेतकऱ्यावर...

मूर्तिजापूर । बोगस ७/१२ तयार करून ‘या’ सोंगाड्या तलाठ्याने अल्पभूधारक शेतकऱ्याला गंडवलं…शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी…

मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जमिनीचा हस्तलिखित 7/12 तयार करून जमीन धनाड्याच्या घशात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिडीत शेतकरी महसूल कार्यालयाच्या चकरा मारत असून या खादाड तलाठ्याची वरिष्ठाकडे तक्रार दाखल केली असून मात्र आतापर्यंत कोणतेही कारवाई झाली नसल्याचं शेतकरी सांगत आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात पैशे खाण्यात पटाईत असलेला हा सोंगाड्या पटवारी सर्वश्रुत आहे, लोकांना याच्या खादाड वृतीबाद्द्ल चांगलीच माहिती आहे, मात्र कोणाचेही तक्रार करायची हिम्मत होत नाही. हा एवढ्या अफाट संपतीचा मालक असून सुद्धा गरिबांना एक रुपया सोडत नाही. शहरात त्याच्या अलिशान बंगल्यात त्याच मिनी कार्यालय चालते. पैशे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, सेतू पेक्षाही हा जास्त पैसे आकारतो. त्यात मग असले गरीब शेतकरी मिळाले तर त्याची चांदीच म्हणावी लागेल. वरिष्ठांना या बाबत माहिती असून सुद्धा त्याचे एवढे लाड का पुरविले जातात?…हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

पिडीत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत शेतकर्याचे वडिलोपार्जित शेत उनखेड येथे असून ते शेत त्याच्या वडिलांच्या नावाने होते ते बुडीत क्षेत्रात येत असल्याने त्याची खरेदी करण्यासाठी या तलाठ्याने नकली खोटा हस्तलिखित सातबारा तयार करून दिला तसेच या तलाठ्याने शासनाची दिशाभूल फसवणूक करून गट नंबर 26 चे प्रमाणपत्र मिळवले आणि त्या एक लावून 126 ची बोगस खरेदी करून घेतली त्या बोगस खरेदीमुळे सदर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर हा तलाठी कोण? याबाबत सविस्तर पुढील अंकात…(क्रमश)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: